Diarrhoea & Dehydration In Children in Jogeshwari, Andheri Mumbai

Diarrhoea & Dehydration in Children

अतिसार किंवा जुलाब किंवा डायरिया या सर्वांचा अर्थ म्हणजे पातळ संडास लागणे होय. लहान बाळाला शी जास्त प्रमाणात होते, तेव्हा बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डीहायड्रेशन होऊ शकते. सोबत इलेक्ट्रोलाईट पातळी मधे असंतुलन ( सोडियम व पोटॅशियम) ची सुद्धा कमतरता होऊ शकते, हे सगळे बाळाच्या आरोग्यासाठी अति हानिकारक असुन बाळाच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो. डीहायड्रेशन ची लक्षणे लवकरात लवकर ओळखून बाळाला हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ जास्त तहान लागणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, डोळे खोल जाणे, सुस्ती येणे इत्यादी लक्षणे आढळल्यास स्माईल हॉस्पिटलच्या डायरिया विभागात अत्यंत तज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहे. 

;