Poisoning In Children By Hand Sanitiser in Jogeshwari, Andheri Mumbai

Poisoning in Children by Hand Sanitiser

हॅन्ड सॅनिटायझरमुळे मुलांमध्ये विषबाधा होऊ शकते..
हॅन्ड सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल चे प्रमाण 60% पेक्षा जास्त असते जे अल्कोहोलिक पेयांमध्ये जास्तीत जास्त फक्त 5% -40% अल्कोहोल असते.
5 वर्षापेक्षा कमी वया च्या मुलांनी हॅन्ड सॅनिटायझर चुकून गिळल्यामुळे सुद्धा गंभीर विषबाधा होऊ शकते. ज्यामुळे मुले झोपी जाऊ शकतात, बेशुद्ध होऊ शकतात, तसेच त्यांना फिट येऊ शकते, त्यांच्या रक्तातील साखर चे प्रमाण कमी होऊ शकते.
हॅन्ड सॅनिटायझर च्या विषबाधामुळे मुलांच्या जिवास धोका उत्पन्न होऊ शकतो
हॅन्ड सॅनिटायझर चा उपयोग लहान मुलांनी पालकांच्या उपस्थित च करावयास हवा तसेच लहान मुलांच्या पोहोच पासून दूर ठेवा. जर मुलाने चुकून अगदी कमी प्रमाणात सुद्धा हॅन्ड सॅनिटायझर चे सेवन केले असले तरी ताबडतोब रुग्णालयात आणा.
मिथेनॉल, लाकडापासून निर्मित अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल किंवा मिथिलेटेड स्पिरिट असलेले हॅन्ड सॅनिटायझर चा उपयोग करू नका.
 

;