
Sleep in Children
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप...
आपल्या व आपल्या मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झोपेचे फार महत्त्व आहे. पुरेशी झोप हे आरोग्यवर्धक असते. पुरेशी झोप किती तास घ्यावी? हे आपल्या वयावर अवलंबून असते. दहा वर्षाखालील मुलांसाठी दररोज कमीत कमी नऊ ते दहा तास व दहा वर्षावरील मुलांसाठी कमीत कमी आठ ते नऊ तास झोप आवश्यक असते. झोपण्याची वेळ व जागे होण्याची वेळ दररोज (रविवारी सुद्धा) नियमित असायला पाहिजे. अन्यथा आपल्या मेंदूमधील बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होते. व यामुळे आपल्या आरोग्यास विविध प्रकारचे धोके संभवतात.