What Is Ideal Screen Time In My Child in Jogeshwari, Andheri Mumbai

What is ideal Screen time in my child

१) स्क्रीन चा वापर शक्यतो जेवढा कमी करता येईल तितक्या कमी करण्याचा प्रयत्न करावा.
२) मुलांना चांगली झोप, योग्य आहार आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावा.
३) स्क्रीन चा ब्रेक घ्याः २०/२०/२० चा नियम म्हणजे प्रत्येक 20 मिनिटांच्या स्क्रीन टाइम नंतर 20 सेकंद साठी 20 फूट दूर अंतरावर बघायला सांगा. दर एक तासाच्या वापरा नंतर 10 मिनिटांचा ब्रेक देखील घ्यावा.
४) डोळे उघडझाप करणे: आपल्या मुलांच्या डोळ्यांची उघड झाप करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा, विशेषत: स्क्रीन पासून ब्रेक घेताना.
५) स्क्रीनची स्थिती आणि फॉन्ट चा आकार- आपल्या मुलांच्या संगणकाची स्क्रीन डोळ्याच्या पातळीपेक्षा किंचित खाली असल्याचे सुनिश्चित करा. १/२/१० च्या नियमाच्या आधारे डिव्हाइसची स्क्रीन स्थित करा: मोबाइल फोन व आपल्यामध्ये १ फूट अंतर असावे , डेस्कटॉप व लॅपटॉप चा उपयोग २ फूट अंतर ठेऊन करावा,आणि टीव्ही स्क्रीनसाठी अंदाजे 10 फूट (स्क्रीन किती मोठी आहे यावर अवलंबून) अंतर असावे. फॉन्ट चा आकार समायोजित करणे - विशेषत: लहान स्क्रीन वर फॉन्ट चा आकार मोठा ठेवा जेणेकरून आपल्या मुलास आरामात वाचता येईल व त्यामुळे डोळ्यांना थकवा कमी जाणवेल.
६) खोलीतील प्रकाश: संगणक किंवा इतर स्क्रीन वापरतांना खोलीत लाईटिंगची प्रखरता कागदावर लिहिणे किंवा हस्तकलेवर काम करणे यासारख्या क्रियांना लागणाऱ्या लाइटिंग पेक्षा अंदाजे अर्धे असावे. उघड्या खिडक्या, दिवे आणि ओव्हरहेड लाइट चा प्रकाश थेट स्क्रीन वर चमकू नये, तसेच स्क्रीन चा ब्राईटनेस कमी असावा.
 

;